फेसबुक आणणार इंटरनेट वाहून नेणारी ड्रोन

drone
इंटरनेटपासून अद्यापीही दूर असलेल्या जगातील २/३ जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना इंटरनेट जाळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी सोशल नेटवर्कीग साईट फेसबुकने सोलर उर्जेवर चालणारी आणि इंटरनेट वाहून नेऊ शकणारी ड्रोन विमाने वापरात आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्या हस्ते मार्च महिन्यातच फेसबुक कनेक्शन लॅबचे उद्घाटन झाले होते व आता प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली असल्याचे समजते.

या प्रकल्पांतर्गत सोलर पॉवरवर चालणारी मानवरहित ड्रोन पृथ्वीच्या वातावरणाच्या वर म्हणजे ६० ते ९० हजार किलोमीटर उंचीवर पाठविली जाणार आहेत. ही विमाने व्यावसायिक विमानांच्या आकाराची असतील आणि इंटरनेट किरणे वाहून नेण्याची त्यांची क्षमता असेल. यामुळे जगात इंटरनेटपासून अजून दूर असलेल्या जनतेला इंटरनेट अॅक्सिस उपलब्ध होऊ शकणार आहे असे न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सोशल गुड समिटमध्ये फेसबुकचे अभियांत्रिकी संचालक येल मॅग्युअर यांनी सांगितले. २०१५ पासून या साठीचे टेस्टींग सुरू होत असल्याचेही ते म्हणाले.

अमेरिकेतूनच टेस्टींग प्रोग्राम राबविला जाणार असल्याचे सांगून येल म्हणाले की एकाचवेळी अनेक ड्रोन कांही महिने, कांही वर्षे किवा त्यापेक्षाही अधिक काळ पृथ्वीच्या वातावरणाच्या वर उडविणे त्यासाठी आवश्यक आहे. ही विमाने ६० ते ९० हजार फुटांवर उडवावी लागतील. कोणतीच विमाने या हाईटवर सध्या उडत नाहीत. ड्रोन तर नाहीतच. सध्याच्या हवाई नियमानुसार एका विमानासाठी एक पायलट असणे बंधनकारक आहे मात्र आम्हाला १ पायलट १०० विमाने नियंत्रित करू शकेल अशी व्यवस्था उभारायची आहे.

Leave a Comment