दार्जिलिंगची टॉय ट्रेन डिसेंबरपासून धावणार

toytrain
दार्जिलिंग- जागतिक वारसा यादीत नोंदली गेलेली पण गेली तीन वर्षे बंद असलेली दार्जिलिंगची लोकप्रिय टॉय ट्रेन येत्या डिसेंबरपासून पुन्हा रूळावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हिमालयन रेल्वे तर्फे ही ट्रेन चालविली जाते. ट्रेन पुन्हा सुरू झाल्यानंतर सिलीगुडी ते दार्जिलिंग हिल टॉप मार्गावरील नितांतसुंदर प्रवासाचा लाभ पर्यटक घेऊ शकणार आहेत.

उत्तर पूर्व फ्रंटियर रेल्वे डिव्हिजन चे मॅनेजर ए.के. शर्मा म्हणाले की तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०११ सालात या मार्गावर प्रचंड दरडी कोसळल्याने मार्ग उद्वस्त झाला होता. या मार्गाची दुरस्ती हाती घेण्यात आली होती त्यापैकी आता अगदी थोडे काम बाकी आहे. वर्षअखेरपासून पर्यटक या जॉय राईडचा आनंद उपभोगू शकतील.

या टॉय ट्रेनची सुरवात १८८१ साली सर अॅश्ले एडन यांनी केली होती. त्याकाळी ते प.बंगालचे लेफ्टनंट गर्व्हनर होते. युनेस्कोने या गाडीचा जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे. सिलीगुडी ते दार्जिलिंग असा ८७ किमीचा हा प्रवास अतिशय रोमांचकारी आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे दार्जिलिंगचे खासदार अहलुवालिया यांनी या रेल्वेमार्गाची दुरूस्ती लवकर पुरी करावी म्हणून लकडा लावला होता.

Leave a Comment