मेटिजने मुलांसाठी आणला एडी जी ७० टॅब्लेट

metis
मेटिज लर्निंग कंपनीने इंटेल चीपसह २ ते १० वयोगटातील मुलांसाठी एडी जी ७० टॅब्लेट पीसी बाजारात आणला आहे. या टॅब्लेटची किमत ९९९९ रूपये असून तो अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे. कंपनीने या टॅब्लेटसाठी लिमिटेड पिरीयड डिस्काऊंटही दिला आहे. निवडक ग्राहकांना तो ४५०० रूपयांत मिळू शकणार आहे.

या टॅब्लेटला ७ इंची स्क्रीन, आयपीएस डिस्प्ले स्क्रॅच प्रूफ स्क्रिन दिला गेला आहे. १६ जीबीची इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. अँड्राईड जेलीबीन ४.२.२ ओएस सह असलेल्या या टॅबला मुलांसाठी १६० खास अॅप्स दिली गेली आहेत. त्यांच्या मदतीने मुलांना शिकणे अधिक सुलभ आणि मनोरंजकही बनणार आहे.

Leave a Comment