ओडोमासचे वेअरेबल रिस्टबँड आणि पॅच

odomos
सुप्रसिद्ध डाबर कंपनीने त्यांच्या ओडोमास ब्रँडखाली वेअरेबल मॉस्किटो रिपेलंट उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांसाठी त्यांनी लोकप्रिय पोगो वाहिनीशी करार केला असून छोटा भीमची छबी या उत्पादनांवर छापण्यासंबंधी हा करार केला गेला आहे.

डाबर इंडिया च्या विपणन विभागाचे प्रमुख अजय मोटवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार रिस्टबँड आणि पॅच ही दोन्ही उत्पादने वॉटरप्रूफ आणि पूर्णपणे नैसर्गिक द्रव्यांनी बनविलेली आहेत. या उत्पादनांमुळे डासांपासून केवळ घरातच नव्हे तर बाहेरही संरक्षण मिळू शकणार आहे. रिस्ट बँडची किंमत १९९ रूपये असून ते पंधरा दिवस चालेल तर पॅच पासून १२ तास संरक्षण मिळेल. पॅच १० व २४ च्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांची किमत आहे अनुक्रमे १२० व २६५ रूपये.

Leave a Comment