गुगल भारतात देणार ऑफलाईन मोड सुविधा

utube
गुगलने भारतात नुकताच अँड्राईड वन स्मार्टफोन लाँच केल्यानंतर लगेचच भारतीय युजरसाठी ऑफलाईन मोड सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे युजर बिना डेटा कनेक्शन ऑफलाईन यूटयूब व्हिडीओ सेवा वापरू शकणार आहेत.

कंपनीचे अधिकारी सीझर सेनगुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या कांही आठवड्यातच ही सेवा भारतीय युजरना उपलब्ध करून दिली जात आहे. युजरची सोय लक्षात घेऊन ही सेवा सुरू होत आहे. यामुळे युजर ऑफलाईन मोड मध्येही यू ट्यूब व्हिडीओ डाऊनलोड करू शकतील तसेच व्हिडीओ पाहूही शकतील. भारतात मोबाईल आणि टब्लेटवर यू ट्यूब युजरचा ४० टक्के ट्राफिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment