भारतीय नोकराणीसाठी भरावी लागणार बँक गॅरंटी

bai
दुबई – कुवेत मध्ये भारतीय नोकराणी कामावर ठेवायची असल्यास इच्छुक मालकाला २५०० डॉलर्सची बँक गॅरंटी जमा करावी लागणार आहे. परदेशातील महिला कामगार सुरक्षेसाठी भारत सरकारने हे पाऊल उचलले असून त्याची घोषणा कुवेतमधील भारतीय दूतावासातर्फे करण्यात आली आहे. तसे पत्रकही दूतावासाने प्रसिद्ध केले आहे. हा नियम त्वरीत लागू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घरगुती कामासाठी भारतीय नोकर महिला ठेवू इच्छीणार्‍या घरमालकांना संबंधित महिला कुवेत मध्ये असेपर्यंत ही बँक गॅरंटी ठेवावी लागणार आहे. बँक गॅरंटीचे कलम पूर्ण केल्यानंतरच घरगुती कामाचा करार केला जाणार आहे. कुवेतमध्ये सुमारे साडेसात लाख भारतीय राहात आहेत. त्यातील घरगुती कामगारांची संख्या २ लाख ७० हजार आहे तर खासगी क्षेत्रात ३ लाख ६० हजार कर्मचारी आहेत. डिपेंडंट व्हिसावर राहणार्‍या भारतीयांची संख्या १ लाखांवर आहे.

Leave a Comment