आता १०० व १००० च्या बनावट नोटा

currency
मुंबई – बनावट नोटा बनविणार्‍यांनी सध्या ५०० रूपयांच्या नोटांपेक्षा १०० व १००० च्या बनावट नोटांवर अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. आजही बनावट नोटा तयार करणारे ५०० च्या नोटांना अधिक पसंती देत असले तरी १००० व १०० च्या बनावट नोटांचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले असल्याचे दिसून आले आहे.

२०१३-१४ च्या अर्थिक वर्षात बँकीग प्रणालीने ५०० रूपयांच्या २.५२ लाख नोटा पकडल्या आहेत. त्याचबरोबर १००० रूपयांच्या १.१० लाख तर १०० रूपयांच्या १.१८ लाख नोटा पकडल्या आहेत. गतवर्षी हेच प्रमाण अनुक्रमे ९८४५९ व १ लाख नोटा असे होते. म्हणजे यंदाचे १००० नोटांचे प्रमाण ११.८ टक्के तर १०० च्या नोटांचे प्रमाण ९.८ टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेने ५०० रूपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण १०.३ टक्क्यांनी कमी झाले आहे. यात पोलिसांनी पकडलेल्या बनावट नोटांचा समावेश नाही.

रिझर्व्ह बँकेने जुलै२०१३ ते जून २०१४ या काळात चलनी नोटा छपाई, सुरक्षा व वितरण खर्चात लक्षणीय वाढ केली असून त्यासाठी ३२.१ अब्ज रूपये खर्च केले आहेत. गतवर्षी हीच रक्कम २८.७ अब्ज रूपये होती असे समजते.

Leave a Comment