फ्री कॉलिंगची सुविधा वॉट्स अ‍ॅपवर मिळणार ?

whatsapp
मुंबई – मुंबई: सर्वात प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्स अॅप मोबाईल अॅप्लिकेशन आता फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे कळटे आहे. याचा फायदा व्हॉट्स अॅपचा वापर करणाऱ्या ६० कोटी ग्राहकांना होणार आहे. भारतातच व्हॉट्स अॅपचे ५ कोटींहून अधिक उपभोगते असून व्हॉट्स अॅप ही फ्री मेसेजची सुविधा देणारी कंपनी काही दिवसांपूर्वीच फेसबुकने विकत घेतली आहे. जर फ्रि कॉलिंगची सुविधा जर व्हॉट्स अॅपवर उपलब्ध असेल तर ती फेसबुकवरही मिळेल अशीही चर्चा आहे.

यासंदर्भात कंपनीचे काही गोपनीय अहवाल फुटल्यामुळे फ्री कॉलिंगच्या बातमीला पाय फुटले असून व्हॉट्स अ‍ॅपच्या इंटरफेसमध्ये नुकतेच करण्यात आलेले बदलही नवी सेवा दाखल होणार असल्याचे संकेत देणारे आहेत. फुटलेल्या अहवालांमध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आलेला कॉल घेतला तर युजर इंटरफेस कसा असेल हे दाखवणारी छायाचित्रे आहेत. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप फ्री कॉलिंगची सुविधा देणार अशी बातमी सध्या रंगलेली आहे.

Leave a Comment