अॅपल आयफोन ६ व स्मार्टवॉच ९ सप्टेंबरला सादर

apple
अॅपलचा बहुचर्चित आयफोन सिक्स आणि पहिलेवहिले स्मार्टवॉच सप्टेंबरच्या नऊ तारखेला कॅलिफोर्नियातील क्युपरटिनो या होमटाऊनमध्ये सादर केले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या संदर्भातले संदिग्ध स्वरूपातले निमंत्रण जारी केले गेले आहे.

अॅपलने सादर केलेल्या पहिल्या आयफोन व त्यानंतरच्या आयपॅड पासूनच म्हणजे २००७ पासून अशी निमंत्रणे हा अॅपलसाठी वार्षिक कार्यक्रम बनला आहे. आयफोन सहा व स्मार्टवॉच कंपनीचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याने ३० वर्षांपूर्वी जेथे ओरिजिनल मॅक संगणक प्रथम सादर केला होता त्याच जागी सादर केले जाणार असल्याचेही समजते.

अॅपल आयफोन सिक्स दोन व्हेरिएंटमध्ये येत असून एकाचा स्क्रिन ४.७ इंचाचा तर दुसर्‍याचा ५.५ इंचाचा असेल. अँड्राईड ऑपरेटिग सिस्टीमसह हे फोन येणार आहेत. अॅपलच्या स्मार्टवॉचला या क्षेत्रात अगोदरचपासून पाय रोवलेल्या सॅमसंगशी तगडी स्पर्धा करावी लागणार आहे. कंपनीचा सीईओ टीम कुक यांनी आयर्वाच हा ट्रेडमार्क यासाठी मिळविला आहे आणि अनेक देशात याच ट्रेडमार्कचा वापर होणार आहे. या वॉचसाठी फॅशन जगतातील अनेक टॉपच्या डिझायनर्सचे सहाय्य घेतले गेले असल्याचेही समजते. हे वॉच अत्यंत स्टायलीश असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment