राजमुंदरीतून यंदाही महाप्रंचड लाडू रवाना

laddu
हैद्राबाद- हैद्राबादपासून जवळच असलेल्या राजमुंदरी या गावातील हलवाई श्रीनूबाबू यांनी यंदाही गणेशाच्या प्रसादासाठी महाप्रचंड लाडू तयार केले असून त्यातील एक ७५०० किलोचा तर दुसरा ५ हजार किलोचा आहे. मोठा लाडू विशाखापट्टणमच्या विशाखा युवा संघासाठी तर दुसरा हैद्राबादच्या खरताबाद येथील मंडळासाठी रवाना केले गेले आहेत.

श्रीनीबाबूंचे दुकान गणेशासाठी असे महाप्रचंड आकाराचे लाडू बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.यंदाचे लाडू काजू बदामांची सजविले गेले आहेत आणि १० किलोपासून ते १२०० किलो वजनापर्यंतचे लाडू बनविण्यासाठी ४८० मंडळांच्या ऑर्डर त्यांच्याकडे आल्या आहेत. दोन्ही महालाडू आज गणेशस्थापना व पूजा झाल्यानंतर नैवेद्य म्हणून गणेशाला दाखविले जाणार आहेत व नंतर ते भाविकांना प्रसाद म्हणून वाटले जाणार आहेत.

Leave a Comment