लालबागच्या राजाचे मंत्रमुग्ध मुखदर्शन

lalbaugcha-raja
मुंबई – आता मोजकेच दिवस उरले आहेत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला! त्याच पार्श्वभूमीवर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे पहिले मुख दर्शन करण्याचे सौभाग्य भाविकांना मिळाले असून या राजाची पहिली छवि आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सर्वच दृष्टीने अनेक अर्थाने खरा राजा असलेला हा गणपती येत्या गणेशचतुर्थीला विधीपूर्वक प्रतिष्ठापना केला जाईल आणि त्यापुढील दहा दिवस अगणित भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतील.
lalbaugcha-raja1
केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर देशभरातील तसेच परदेशातील भाविकांच्या मनात अढळस्थानी असलेल्या या राजाचा यंदा ५१ कोटी रूपयांचा विमा उतरविला गेला असून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा ३० कोटीचा अपघात विमा आहे तर राजाच्या दागिन्यांसाठी साडेसात कोटीचा विमा उतरविला गेला आहे. गणेशचतुर्थीला स्थापना झाल्यानंतर पहाटे तीन पासून भाविकांच्या रांगा पावसापाण्याची पर्वा न करता दरवर्षीप्रमाणेच लागतील आणि भाविक यथाशक्ती दान देऊन राजाची सेवा करतील.
lalbaugcha-raja2
आठवडाभर कामाच्या दिवसांतही या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अडीच ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते तर सुटीचा दिवशी हाच कालावधी ८ ते १० तासांवर जातो. पाचव्या दिवशी गर्दीचा उच्चांक होतो आणि अगदी १० किमी लांबीची लाईनही दर्शनासाठी असते. जे भाविक नवस फेडण्यासाठी येतात त्यांच्यासाठी वेगळी लाईन असते आणि तेथे २५ ते ३० तासांची प्रतीक्षाही करावी लागते असे समजते.

Leave a Comment