इंटेक्सचा सर्वात स्वस्त क्लाऊड एफएक्स स्मार्टफोन सादर

intex
देशी कंपनी इंटेक्सने भारतातील पहिला फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम असलेला स्मार्टफोन हँडसेट क्लाऊड एफएक्स नावाने बाजारात आणला आहे. देशातील हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा असून त्याची किंमत आहे १९९९ रूपये. स्नॅपडील या ऑनलाईन रिटेल कंपनीतर्फे हा फोन ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे.

भारतात स्मार्टफोनची बाजारपेठ वेगाने वाढते आहेच आणि त्यात मोठा वाटा सहज परवडणार्‍या किंमतीतील स्मार्टफोन सेक्टरचा आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठीच इंटेक्सने हा फोन बाजारात आणला आहे. टायर टू आणि टायर थ्री शहरातील ग्राहकांना नजरेसमोर ठेवून हा फोन सादर केला गेला आहे. फिचर फोनपेक्षा अधिक कांही हवे असणार्‍या ग्राहकांसाठी हा फोन आदर्श असेल असाही कंपनीचा दावा असल्याचे कंपनीचे टेक्नॉलॉजिकल संचालक केशव बन्सल यांनी सांगितले.

कंपनीने येत्या ३ महिन्यात पाच लाख फोन विक्रीचे उदिष्ट्य ठेवले असल्याचे सांगून बन्सल म्हणाले की मोझिला सॉफ्टवेअरने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी कंपनीबरोबर भागीदारी केली आहे.या स्मार्टफोनला २५६ एमबी मेमरी, ती ४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, २ एमपी चा रियर कॅमेरा व फ्रंट कॅमेरा , ड्युअल सिम अशा सुविधा आहेत.

Leave a Comment