‘फ्लिपकार्ट’ सात वर्षांत झाले खरबपती!

flipcart
बंगळुरू : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चे कल्पक सचिन आणि बिन्नी बन्सल संयुक्त रुपात उत्पन्नाच्या बाबतीत नारायण मूर्ती आणि नंदन निलकेणी यांच्या काही पावलेच मागे आहेत.

‘फ्लिपकार्ट’ची स्थापना करून आत्तापर्यंत सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी जवळपास 6000 करोड पेक्षा जास्त संपत्ती मिळवली असून आता सचिन आणि बिन्नी बन्सलचा कंपनीतील वाटा जवळपास 15 टक्क्यांवर पोहचला आहे.

नारायण मूर्ती कुटुंबातील चार सदस्यांची एकूण संपत्ती जवळपास 8,700 करोड रुपये असून यांच्याखेरीज बंगळुरूचे नंदन निलकेणी यांच्या कुटुंबाची संपत्ती 6500 करोड रुपये आहे.

अनेक अरबपती उद्योगपतींना अमेरिका आणि चीनच्या इंटरनेट मार्केटने उजेडात आणले आहे.

Leave a Comment