भारतातील १७३ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

birds
वाढते प्रदूषण आणि मानवाचा निसर्गात होणार्‍या वाढत्या हस्तक्षेपामुळे वन्य पशू-पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेन्शन ऑफ नेचर लिस्ट (आययूसीएन)ने जारी केलेल्या ताज्या अहवालात भारतातील आठ पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे.आययूसीएने भारतातील १७३ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या परिस्थितीत पोहचल्याचे एका अहवालात म्हटले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, बर्ड लाइफ इंटरनॅशनल आणि इतर संबंधित संस्थांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात आणखी आठ पक्ष्यांच्या प्रजातीवर धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. वुली नेकड स्ट्रोक, अंदमान टिल, अंदमान हिरवा कबूतर, राखाडी मानेचा कबूतर, लाल डोक्याचा फाल्कन, हिमालयीन ग्रिफॉन, बीअर डेट गिधाड आणि युनान नुतूचा यांचा समावेश आहे. यामधील बहुसंख्य पक्ष्यांचा अधिवास ईशान्य-पूर्व भारतात आहे. वुली नेकड स्ट्रोक भारतात बहुतांश भागात आढळतो. अंदमान आणि ग्रेट लोको बेटांवर अंदमान टिलाचे वास्तव असून त्याच्या शेवटच्या १ हजार प्रजातीचे अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे अंदमान हिरवा कबूतर शेवटची घटका मोजत आहे. राखाडी मानेचा हिरव्या कबुतराचे ईशान्य-पूर्व भारतात अधिवास आहे. हिमालयीन ग्रिफॉन नावाप्रमाणे हिमालय पर्वत रांगांमध्ये दिसतो. युनान नुतूचाचे चीन आणि भारताच्या आसाम येथील सीमा परिसरात वास्तव आहे.

Leave a Comment