क्रेडीट कार्ड म्हणून वापरा अॅपलचे आय वॉलेट

iwallet2
अॅपलने आय वॉलेट हे अॅप लाँच करण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या नव्या आयफोन सहा बरोबरच हे अॅप उपलब्ध केले जाईल असे सांगितले जात आहे. हे अॅप क्रेडीट कार्डाप्रमाणे काम करेल. यासाठी अॅपलने व्हिसाच्या सहकार्याने कस्टमर आयडेंटिटी प्रमाणित करण्यासाठी टच आयडी फिंगर प्रिट सेंन्सरचा उपयोग करून घेतला आहे. यामुळे युजर कोणत्याही दुकानातून सामान घेतल्यानंतर फोनच्या सहाय्यानेच कोणत्याही धोक्याशिवाय मालाचे पैसे चुकते करू शकणार आहेत.

माल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल देण्याच्या अनेक पद्धती वापरात आहेत. त्यामुळे अॅपलने हे जाणून घेण्यासाठी अनेक संबंधित कंपन्यांबरोबर बोलणी केली आहेत आणि त्यानंतरच हे मोबाईल वॉलेट बनविले आहे असे कंपनीतील अधिकारी सांगतात. आयफोन सिक्समध्ये एक असेही हार्डवेअर असेल जे युजरने स्टोअर केलेल्या सर्व संवेदनशील डेटा एकमद सुरक्षित ठेवेल. त्यात मोबाईल फर्मही दखलअंदाजी करू शकणार नाही.

Leave a Comment