सुवर्णपदकासह बिंद्राचा राष्ट्रकुल स्पर्धांना अलविदा

bindra
ग्लासगो – शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा खेळत असलेल्या भारताचा निशाणेबाज अभिनव बिंद्राने नवीन रेकार्ड नोंदवून सुवर्णपदकासह या स्पर्धांना अलविदा केले आहे. १० मीटर एअर रायफल मध्ये २०५.३ अंक मिळवून ब्रिंदाने नवीन रेकॉर्ड नोंदविले आहे. वैयक्तीक सुवर्णपदकाने बिंद्रला सलग चार वेळा हुलकावणी दिली होती मात्र यंदा त्याने हे पदक हासील केले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धांतून आत्तापर्यंत ३ सुवर्णासह ९ पदके मिळविलेल्या बिद्राने फायनल राऊंडमध्ये एकही चूक केली नाही. ऑलींपिक स्पर्धातीलही तो एकमेव सुवर्णपदक विजेता आहे. पाच राष्ट्रकुल स्पर्धा आणि नऊ पदके या आपल्या कामगिरीवर आपण संतुष्ट आहोत असे सांगताना बिंद्राने निवृत्तींनंतर पत्रकारिता करण्याचा विचार असल्याचे सांगितले. या स्पर्धेतील सुवर्णपदक हे खूप अभिमानाचे असल्याचे सांगून तो म्हणाला की मी या पदकासाठी खूप कष्ट घेतले होते त्याचे चीज झाले आहे. २०१६ ची ऑलींपिक स्पर्धा शेवटची असेल का याचे उत्तर मात्र त्याने दिले नाही.

Leave a Comment