आयफोन सिक्स विषयी अॅपलला मोठी उमेद

apple
अॅपलच्या आयफोन सिक्स विषयीची उत्सुकता जगभरात वाढत चालली असताना कंपनीलाही आपल्या या उत्पादनाबाबत गाढ विश्वास वाटत असल्याचे सांगितले जात आहे. अॅपलने त्यांच्या उत्पादक कंपन्यांना दोन्ही आगामी आयफोनची ७ ते ८ कोटी युनिट तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते. आयफोनसाठी उत्पादनाचा हा आकडा आत्तापर्यंत सर्वात मोठा आहे.

आयफोन सिक्स ४.७ व ५.५ इंच अशा दोन व्हर्जनमध्ये आणला जात आहे. यापूर्वीच्या आयफोन ५एस व ५ सी साठी ५ व ६ कोटी युनिट उत्पादनाची ऑर्डर दिली गेली होती. ४.७ इंची आयफोन सिक्सचे उत्पादन पेगाट्रान व फॉक्सकॉन कंपन्यात ऑगस्टपासून सुरू होत आहे तर ५.५ इंची आयफोनचे उत्पादन होनहाय प्रिसिजन इंडस्ट्री सप्टेंबरपासून सुरू करणार आहे.

आयफोन सिक्स आयफोन पाच पेक्षा मोठे आहेत. ते मेटलकेस व मल्टीकलर मध्ये बनविले जातील. या फोनना सेल टन पॅनल तंत्रज्ञान वापरून बनविलेले डिस्प्ले देण्यात येणार आहेत. मात्र कदाचित ५.५ इंची फोनसाठी हे डिस्प्ले फेल होतील या शंकेने कांपोनंट मेकरना १२ कोटी युनिट तयार करण्याची ऑर्डर दिली गेली असल्याचेही वृत्त आहे.

Leave a Comment