महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळवू देणार नाही ;फडणवीस

devendra-fadanvis
पुणे – महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्यास विरोध केला जाईल ,अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

गुजरातकडून पार-तापी-नर्मदा (पीटीएन) लिंक योजनेला गती देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविल्यास महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहू,अशी ग्वाही देताना ते म्हणाले ,

गुजरात सरकारकडून तापी नदीचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा प्रयत्न होत असेल, आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहू असे नमूद करून पाटबंधारे गैरव्यवहाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व अंमलबजावणी संचालनालय यांच्यामार्फत करण्यात यावी.अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी चितळे समिती अहवाल प्रकरणात सभागृहाची आणि न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा आरोपही त्यांनी केला .

Leave a Comment