ब्रेकिंग न्यूज :

पॉर्नस्टार ही खरी ओळख-

पॉर्नस्टार सनी लिऑन आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. पॉर्न चित्रपटानंतर सनीने आपलं करिअर बॉलिवूडमध्ये करण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.पॉर्नस्टारपासून बॉलिवूडची स्टार इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना सनी लिऑन म्हणतेय, की पॉर्नस्टार असल्यामुळेच मला आज लोक ओळखत आहेत. आज मी जे काही आहे ते यामुळेच म्हणून आपल्याला एक पॉर्नस्टार असल्याबद्दल अजिबात खंत नाही, असेही तिने म्हटले आहे. सध्या सनी रुपेरी पडद्यावर आपलं नशीब आजमावत आहे. ती आता बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवण्याच्या मार्गावर आहे. एक पॉर्नस्टार असल्यामुळे सनीला अनेकदा टीकांनाही सामोरे जावे लागले आहे. तिच्या या ओळखीमुळे अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी तिच्या बरोबर काम करणेही नाकारले आहे. एका मुलाखतीत तिने असंही म्हटल आहे की, त्यात काय झालं की मी एक पॉर्नस्टार आहे. माझी ओळखच त्यामुळे आहे. लोक जर मला ओळखतात तर ते केवळ पॉर्न चित्रपटांमुळेच. मला कधीच स्वत:ला पॉर्नस्टार म्हणवून घ्यायला लाज नाही वाटली. मी माझं काम ईमानदारीने करण्याचा प्रयत्न करते. मग, ते प्रेक्षकांवर अवलंबून आहे की, ते कितपत प्रतिसाद देतात. हल्लीच दिग्दर्शक अनीस बज्मी याने सनीला आपल्या चित्रपटात काम देण्यास नकार दिला होता परंतु, आपल्याला त्याबाबत काही फरक पडत नसल्याचेही तिने सांगितले.


Warning: Invalid argument supplied for foreach() in /home/majhapap/public_html/wp-content/thesis/skins/classic-r/custom.php on line 222

{ 0 comments… add one }

Leave a Comment