कॉमेडी सिनेमात काम करणार- करिश्मा कपूर

बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर येत्या काळात कॉमेडी सिनेमात काम करणार आहे. ती लवकरच पुन्हा सिनेमात काम करणार असून त्याची सुरुवात ती हलक्या कॉमेडी सिनेमापासून करणार आहे. आताच तिने काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे आगमी काळात तिला हवा तास रोल मिळेल असे तिला वाटते.

नुकतीच ती गोदरेज नेचर्स बास्केट स्टोरच्या उद्घाटनासाठी आली होती. यावेळी बोलताना करिश्मा म्हणाली, ‘ मी आतापर्यंत सिनेमात काम करीत असताना कसलीच योजना केली नाही. मात्र येत्या काळात मात्र कॉमेडी सिनेमात काम करण्याचे मनापसून ठरविले आहे. त्यामुळे तसा सिनेमा आला तरच मी काम स्वीकारणार आहे. तसे पहिले तर मला मिठाई खायला खूप आवडते. केक आणि आइसक्रीम खाण्यासाठी खुप आवडतात. मी लहानमुलापेक्षा अधिक मिठाई खाते.’

यापूर्वी करिश्माने ‘डेंजरेस इश्क’ या सिनेमातून पुनरागमन केले होते. मात्र हा सिनेमा बाक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. गेल्या काही दिवसापासून करिश्मा एक लोकप्रिय रेडियो स्टेशनवर फैशनवर आधारित शो करीत आहे. त्याशिवाय ती १९८२ साली आलेल्या ‘सत्ते पे सत्ता’ या रिमेकमध्ये काम करीत आहे. या सिनेमाचे शूट सुरु असून त्यामध्ये ती बीजी आहे.

Leave a Comment